युवतीवर सामूहिक बलात्कार, कणकवलीत खळबळ

सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

कणकवली पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

एका युवतीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री उशिरा याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्या युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली तालुक्या मध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून, 15 ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!