महिलानी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे – अमोल पाठक

कुडाळमध्ये महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन

पोलीस, एमकेसीएल आणि विधिसेवा प्राधिकरण यांचे आयोजन

प्रतिनिधी । कुडाळ : आपल्याला फक्त लिहिता, वाचता आले म्हणजे साक्षरता नव्हे. आपल्याला सक्षमपणे काम करायचे असेल तर त्या पलीकडे जाऊन नवीन आधुनिक काळानुसार बदलत चाललेल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. समाज घडविण्याची शक्ती महिलांमध्ये आहे. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे.परंतु महिलांसाठी असलेल्या कायद्याचाही अभ्यास करावा ,असे आवाहन कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांनी सायबर क्राईम व जनरल अवेरनेस अतर्गत कार्यक्रमात महिलांना केले.उपस्थित काही महिलांनी गाण्यावर नृत्य तसेच फुगडी सादर करुन जान आणली.या कार्यक्रमातून कुडाळ पोलीसांच्यावतीने महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन बरोबरच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नारी सन्मान करण्यात आला.
सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दल व एमकेसीएल तसेच विधी सेवा प्राधिकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या जनसंवाद व सायबर क्राईम व जनरल ओवरनेस या कार्यक्रमा अंतर्गत कुडाळ पोलीस ठाणेच्यावतीने महिलांकरिता सायबर क्राईम महिला विषयक गुन्हे ,आर्थिक गुन्हे या विषयासंदर्भात जनजागृती व नवरात्र उत्सव अनुषंगाने महिलांचा सन्मान कार्यक्रम येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. श्री पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कुडाळच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला विधी सेवा प्राधिकरणचे ऍड. संजय रानडे , एमकेसीएल समन्वयक सई तेली, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोज बेहेरे, डॉ दिपाली काजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष आफ्रीन करोल, नगरसेविका श्वेता गवडे, श्रुती वर्दम, दक्षता समितीच्या श्रीमती खानोलकर यांनी उपस्थिती दर्शविली.
श्री पाठक म्हणाले, महिला उद्योग व्यवसायात पुढे येत आहेत.आधुनिक युगात तंत्रज्ञाचा वापर करणे आज काळाची गरज आहे.परंतु कायद्याचे ज्ञान असणे महत्वाचे जे हक्क व अधिकार महिलांना आहेत त्याची माहिती असणे तेवढेच महत्वाचे असून त्या दृष्टीने कुडाळ पोलीस ठाण्याने हा चांगला उपक्रम राबविला आहे. महिलांनी स्वतः सक्षम बनुंन वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे ,असे सांगितले. महिंलासाठी संवेदनशील सरकार असणे गरजेचे आहे. राज्य घटनेने जो मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यानुसार योग्य उमेदवार निवडून द्याअसे आवाहन त्यांनी केले.
रुणाल मुल्ला म्हणाल्या, महिलेमुळे घराला घरपण असते. महिला कुटुंबाच्या सुखासाठी झटत असते. पुरुषप्रधान सत्ता आल्यानंतर महिलांवर अन्याय होऊ लागला. तिचे महत्त्व कमी होऊ लागले. महिला आपले अस्थित्व विसरली. त्यामुळे शासनाला महिलांच्या संरक्षणासाठी वेगवेगळे कायदे करावे लागत आहेत. महिला शिकली तर आपला समाज, सस्कृती, परंपरा टिकणार आहेत, असे सांगून महिलांना कायद्या माहिती व्हावी.म्हणून हा उपक्रम आयोजित केला आहे. तुमचा प्रतिसाद पाहून आनंद वाटला. अत्याचाराला बळी न जाता त्या विरुद्ध लढा.आवाज उठवा. स्वाभिमानाने जगा,असे आवाहन मुल्ला यानी दुर्गामातेच्या पूजन व महिलांचे समाजातील महत्व याबाबत माहिती दिली.
सई तेली यानी मोबाईलचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत.समाजातील महत्व कमी होताना म्हणून शिकले पाहिजे.सायबर क्राईम मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यासाठी महिलांनी जागरूक राहिले पाहिजे ,असे त्यांनी सांगितले. मोबाईल हाताळताना अनोळखी लिंक क्लिक करू नका, पासवर्ड बदलत राहा, असे आवाहन करून सायबर सुरक्षा म्हणजे काय ? मोबाईल वापरताना योग्य काळजी घेतल्यास आपली फसवणूक कशा पध्द्तीने होऊ शकते, याबाबत सौ तेली यांनी मार्गदर्शन केले.
ऍड. रानडे यानी सविधानने महिलांना मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्ये दिली आहेत,असे सांगून हिसाचार ,मानसिक व शारीरिक छळ.,हुंडा,लैंगिक आत्यचार याबाबत महिलांसाठी असलेल्या कायद्यांची माहिती दिली. विधी सेवा प्राधिकरण महिलासाठी करीत असलेल्या कामाची तसेच ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2007 बाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.श्री बहेरे यानी महिला सक्षमीकरणासाठी प्रशासनाच्या अनेक योजना आहेत.महिलानी आर्थिक समृद्धीसाठी स्वयरोजगार करावेत ,असे सांगून सायबर क्राईम पासून सावध राहा.ओटीपी शेअर करू नका.अलर्ट राहा.असे आवाहन त्यांनी केले.
कुडाळ पोलीस ठाण्याचे हवालदार संजय कदम, रूपेश सारंग व महिला पोलिस कर्मचारी तसेच दिवाणी न्यायालयाचे ज्युनिअर क्लार्क एस आर सावंत,चतुर्थ श्रेणी कर्मचारी एम एस प्रभू उपस्थित होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बचत गट महिला व विविध स्तरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुमारे 350 महिलाची उपस्थित होती. सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यानी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात गायक समीर चाराठकर यानी मी हाय कोळीन हे गीत सादर केले आणि उपस्थित काही महिलांनी व्यासपीठाच्या समोर जोशात नाच केला.काही महिलांनी पारंपरिक फुगडी सादर करून रंगत आणली. प्रारंभी महिला पोलीस योगिता राणे यानी गजानना श्री गणराया गाणे सादर करून वाहवा मिळविली.तर कथ्थक विशारद,नृत्यांगणा मृणाल सावंत तसेच वैष्णवी परब या बालिकेने नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या सास्कृतिक कार्यक्रमांनी व श्री चराठकर यांच्या गायनाने रंगत आणली. हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आला.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!