जादूटोणा विरोधी कायदा कार्यशाळा रविवारी कणकवली इथे.

जिल्ह्यात पीआयएमसी आणि अभाअंनि तर्फे जादूटोणाविरोधी कार्यशाळा
कणकवली/मयूर ठाकुर
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग मध्ये रविवार दि .22/10/2023 रोजी कणकवली कॉलेज कणकवली येथे सकाळी 9.00 ते 5.00 या वेळेत महाराष्ट्र शासनाचा नरबळी आणि इतर अमानुष , अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 थोडक्यात जादूटोणाविरोधी कायदा 2013 या कायद्याची सर्व सामान्य जनतेला ओळख व माहिती व्हावी यासाठी प्रात्यक्षिकासह कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यशाळेला जिल्हाधिकारी तथा पीआयएमसी अध्यक्ष किशोर तावडे सहाय्यक आयुक्त तथा पीआयएमसी सचिव संतोष चिकणे , उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली किशोर सावंत . कणकवली पोलीस ठाणे येथील दक्षता अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अमित यादव , प्राथमिक उपशिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग प्रजापती थोरात , माजी उपशिक्षणाधिकारी तथा शिक्षण मंत्री यांचे सचिव रामचंद्र आंगणे , मनोविकारतज्ञ डॉ. रूपेश पाटकर साहेब , कणकवली कॉलेजचे प्राचार्य युवराज महालिंगे, विद्यामंदिर कणकवली चे मुख्याध्यापक पी जे . कांबळी ,गोपूरी आश्रम कणकवली चे अध्यक्ष राजेंद्र मुंबईकर , अभाअनिसचे राज्य उपाध्यक्ष रविंद्र खानविलकर , अभाअनिचे जिल्हासंपर्कप्रमुख सचिन हिंदळेकर , जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजीव लिंगवत , साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या संस्थापक अध्यक्षा रुपाली पाटील , कणकवली येथील साहित्यिक व कवी डॉ सतिष पवार आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत .
तरी या कार्यशाळेत जास्तीत जास्त सुजाण नागरिकांनी उपस्थित राहून जादूटोणाविरोधी कायद्याची सखोल माहिती घ्यावी असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सरचिटणीस श्री . विजय चौकेकर यांनी प्रसिद्धी माध्यमातून केली आहे .