‘जिव्हाळा’तील वृद्ध निराधारांसोबत विजय चव्हाण यांनी साजरा केला वाढदिवस

निलेश जोशी । कुडाळ : जिव्हाळा सेवाश्रमातील आजी आजोबा यांच्यासोबत माझा झालेला वाढदिवस सर्वोच्च आहे. वृद्ध निराधारमध्ये आपण परमेश्वर पाहतो आणि खऱ्या अर्थाने या परमेश्वराचे दर्शन आपल्याला लाभते त्यातच आपण आपले भावी आयुष्य सुखकर करू शकतो, असे प्रतिपादन पंचायत समिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी शुक्रवारी सायंकाळी जिव्हाळा सेवाश्रम येथे केले . त्यांनी आपला वाढदिवस जिव्हाळा सेवाश्रमातील वृद्ध निराधार यांच्या समवेत साजरा केला
कुडाळ पंचायत समिती गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांनी शुक्रवारी सायंकाळी कुडाळ तालुक्यातील माडयाचीवाडी रायवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमला भेट दिली. यावेळी त्यांनी आपला वाढदिवस हा वृद्ध निराधार यांच्या समवेत साजरा केला. यावेळी यावेळी जिव्हाळा सेवाश्रमचे संस्थापक अध्यक्ष दादा बिर्जे, बाबीदास गावडे, प्रसाद पोईपकर, पंचायत समिती कर्मचारी राजू खेत्री, विनोद राणे, ग्रामसेवक मनोहर शेडगे, राजन गावडे, संतोष सांगळे, सेवाश्रमातील आजी आजोबा मुले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री चव्हाण म्हणाले, वृद्ध निराधार यांच्या पोटी असणारा जिव्हाळा सेवाश्रमचे आमचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष दादा बिर्जे यांनी एक आपुलकीचे जिव्हाळ्याचे नाते जोपासले आहे. या वृद्ध निराधारांशी त्यांचे असणारे ऋणानुबंध हे निश्चितच कौटुंबिक वातावरणातील आहे. आज मोठ्या प्रमाणात वृध्दाश्रम दिसून येत आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. आनंदीमय वातावरण होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे चित्र बदलले असून आपल्या आई वडिलांना अशा वृध्दाश्रमामध्ये ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत. असे चित्र बदलून पूर्वीसारखी ऋणानुबंध जोपासणारी कुटुंब पद्धती निर्माण झाली पाहिजे. या सर्वांना वृध्दाश्रमातून चांगली सेवा देण्याचे काम केले जाते. अशा प्रकारची सेवा माणुसकीचे नाते जोपासत सुरेश बिर्जे करत आहेत. समाजात वावरताना आपण समाजाचे देणे लागतो ही भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे. आज बिर्जे परिवार आणि त्यांची टीम हे सेवाभावी काम करत असताना निश्चितच समाजासाठी प्रेरणा देणारे आहे.
दरम्यान जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून नऊ नोव्हेंबरला होणाऱ्या महाआरोग्य शिबिराला निश्चितच सहकार्य केले जाईल. या ठिकाणी आवश्यकत्या सुविधा देण्यासाठी माझा प्रयत्न राहील, असे सांगितले. जिव्हाळा सेवाश्रमचे संस्थापक दादा बिर्जे यांनी आज हा जिव्हाळा सेवाश्रम दहाव्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे. अनेकांची सेवा करण्यातच आम्ही धन्यता मानत आहोत असे सांगितले. श्री चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजी-आजोबा मुले यांनी औक्षण केले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.