मराठा समाज शिक्षक बांधवांच्यावतीने गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांचा शुभेच्छापर सत्कार

कासर्डे (कणकवली) – वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांची पदोन्नतीने भंडारा जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झालेली आहे.मराठा समाज शिक्षक बांधव कणकवली यांच्या वतीने त्यांच्या कासार्डे येथील निवासस्थानी जाऊन त्यांचा शुभेच्छापर सत्कार करण्यात आला.
कुशाग्र बुद्धिमत्तेचे जयप्रकाश परब यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेची सुरूवात केली.शिक्षक म्हणून सेवेत असतानाच आपली अफाट बुद्धिमत्ता,जिद्द आणि कठोर परिश्रम याच्याआधारे त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि त्यात यश संपादन करुन ते सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत दाखल झाले.सदया ते वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.गटविकास अधिकारी म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने भंडारा जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारीपदी बढतीने त्यांची नियुक्ती केलेली आहे.उच्चस्तरीय अधिकारीपदी नियुक्ती झाली असली तरी आपल्या आई- वडीलांनी आपल्यावर केलेले संस्कार आणि शिक्षणासाठी घेतलेले अपार कष्ट याची जाणीव ठेवत त्यांच्या वागण्या बोलण्यात सामान्य माणसातील नम्रता व आत्मीयता दिसून येते.
कमी वयात त्यांनी हे उत्तुंग यश संपादन केलेले आहे.मराठा तरुणांसाठी हा आदर्श आहे या भावनेतून मराठा समाज शिक्षक बांधव कणकवली यांच्यावतीने त्यांचा ह्रदय सत्कार करुन त्यांना पुढील उत्कर्षमय सेवेसाठी शुभेच्छा देणेत आल्या.
या सत्कार प्रसंगी निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे,केंद्रप्रमुख ए.डी.राणे,संतोष देसाई,प्रशांत दळवी,संतोष राणे,हेमंत राणे,मंगेश राणे,अभिजीत राणे,सुशांत मर्गज,प्रविण कदम,प्रशांत सावंत,गुरुप्रसाद पाटील,सचिन सावंत,सुभाष गांवकर इत्यादी मराठा समाज शिक्षक बांधव उपस्थित होते.





