विशाल परबांकडे दातृत्वाचा गुण, त्यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा…

सभागृह हाऊसफुल्ल; उपदेश देत इंदुरीकर महाराजांचे उपस्थितांना चिमटे…

कुडाळ, उपदेशाचे डोस, मध्येच फटकेबाजी बसलेल्या प्रेक्षकातील काहींना चिमटे काढत, तितक्याच ताकदीने हसवत आणि टोले लगावत इंदुरीकर महाराजांनी आपल्या अनोख्या स्टाईलने कीर्तनासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना खळखळून हसविले. यावेळी विशाल परब यांनी सपत्नीक महाराजांचा सन्मान केला. यावेळी विशाल यांच्यासारखे नव उद्योजक आणि पर्यायाने दाते तयार झाले पाहिजेत तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला केले.

विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सभागृह हाऊसफुल्ल होवून प्रेक्षकांसाठी बाहेर स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती..

यावेळी उपस्थित रसिकांनी इंदुरीकर महाराजांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना तितक्याच प्रभावीपणे दाद दिली. यावेळी उपस्थित प्रेक्षकांना त्यांनी उपदेश देण्याबरोबर खळखळून हसविले. यात मुलांनी मोबाईल पासून दुर राहिले पाहिजे. पालकांचे ऐकले पाहिजे, असे उपदेश त्यांनी दिले तसेच यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांची त्यांनी आपल्या पध्दतीने फिरकी घेतली तसेच मुलांना मोबाईल पासून दुर ठेवण्यासाठी मोबाईल वापरणार नाही असा कठोर निर्णय पालकांनी आणि शिक्षण संस्थांनी घ्यावा, जेणेकरुन तरुण पिढी बरबाद होणार नाही.

यावेळी त्यांनी विशाल परब यांना आर्शिवाद दिले. त्यांच्या सारखा युवा उद्योजक यशस्वी झाला तर नक्कीच तो दाता होतो. त्यामुळे त्यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!