सिंधुदुर्ग भाजपा कायदा सेलच्या संयोजक पदी ऍड. राजेश परुळेकर

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली नियुक्ती जाहीर
सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या कायदा सेलच्या जिल्हा संयोजक पदी ऍड. राजेश परळकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना दिले आहे. यापूर्वी ऍड. परुळेकर यांनी विविध पदांवर काम केले असून, कायदा सेल ची जबाबदारी त्यांनी यापूर्वी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
कणकवली प्रतिनिधी





