पी एम किसान योजनेतील वंचित शेतकरी लाभार्थ्यांना अनुदान त्वरित द्यावे- रमाकांत राऊत
खारेपाटण : प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना आर्थात पी एम किसान योजनेतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित शेतकरी लाभार्त्याना त्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या अंतर्गत येणाऱ्या त्रुटी दूर करून त्यांना शासकीय लाभ त्वरित देण्यात यावा अशी मागणी खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी केली आहे.
याबाबत नुकतीच कणकवली तहसीलदार श्री आर जे पवार यांची श्री रमाकांत राऊत यांनी कणकवली येथे भेट घेतली.व पी एम किसान योजनेतील ज्या लाभार्त्यांची नावे वगळण्यात आली होती.व लाभापासून जिल्ह्यातील व विशेषकरून कणकवली तालुक्यातील जे शेतकरी वंचित राहिले होते.त्यांचा यादीत नव्याने सनावेश करून प्रशासनाच्या वतीने त्यांना तातडीने लाभ मिळवून देण्यात यावा.अशी मागणी देखील श्री रमाकांत राऊत यांनी केली आहे. कणकवली तहसीलदार श्री आर जे पवार साहेब यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करून प्रधान मंत्री शेतकरी सन्मान योजनेतील जे वंचित लाभार्थी आहेत.अशा सर्वांना पी एम किसान अनुदान हप्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. असे आश्वासन श्री राऊत यांना दिले.
खारेपाटण माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांच्या या मागणीमुळे कणकवलीसह जिल्ह्यातील सुमारे १००० पेक्षा अधिक वंचित शेतकरी लाभार्थी यांना त्याचा लाभ होणार आहे.
अस्मिता गिडाळे / कोकण नाऊ / खारेपाटण