आचरा माजी सरपंच नामदेव दाजी पांगे यांचे निधन

आचरा : आचरा गाऊडवाडी येथील श्री नामदेव दाजी पांगे ( ८८ ) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते आचरा गावाचे माजी सरपंच होते. माजी खासदार मधु दंडवते, किशोर पवार, माजी आमदार आप्पासाहेब गोगटे, माजी आमदार बाली किनळेकर, माजी आमदार श्याम कोचरेकर, सेवांगणचे ज्ञानेश देऊलकर यांचे निकटचे सहकारी म्हणून त्यांना ओळखले जायचे, समाजकार्यात त्यांचा नेहमीच सहभाग होता. आचरा हायस्कूल च्या अमृतोत्सवी वर्षाच्या सहाय्यक कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी . महेश पांगे यांचे ते वडील होत.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / आचरा