गणेशोत्सवातूनही बांबू लागवडीसाठी जनजागृती
गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या ! 💐🙏💐
विषेश म्हणजे गणेशोत्सवाचे अवचित्य साधुन आम्ही कोकण ग्रीन वर्ल्डच्या माध्यमातून कोकणात बांबूलागवडीचे जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे . बांबूलागवडीसाठी कोकणातिल जमीन योग्य आहे. प्रत्येक गावात हजारो एकर पडिक जमिन आहे . आम्ही आसाम , त्रिपुरा येथे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न देणारॅ बांबूच्या जातींची नर्सरी सिंधुदुर्गात मुळदे येथे तयार केली आहे . व्यावसायिक उत्पन्न देणारॅ 6 प्रकारच्या जाती खुप चांगल्या स्थितीत पाॅलिहाउस मधे आम्ही तयार केल्या आहेत. त्याची माहिती आम्ही आरती पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवली . सातारा , सांगली , लातूर येथे हजारो एकरांवर बांबूलागवडीचा शुभारंभ मा . मुख्यमंत्र्यांनी केला आहे . कोकणातिल पडिक जमिनींवर मोठ्या प्रमाणावर बांबूलागवड व्हावी आणि कोकणातिल शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा व्हावा हेच उद्देश ठेवून आम्ही कोकण ग्रीन वर्ल्डच्या माध्यमातून, “कोकण बांबू मिशन ” जनजागृती अभियान 2023 – 2030 ही बांबूलागवडीची मोहीम राबविण्यास सुरुवात सुरुवात केली आहे . हे अभियान 2023 ते 2030 पर्यंत आम्ही सुरू ठेवणार आहोत. गणपती उत्सवात आम्ही अनेक गावांत जाऊन तेथील सरपंच, प्रमुख व्यक्ती, शेतकऱ्यांना भेटलो . या उपक्रमाबाबत त्यांना योग्य माहिती देउन बांबूलागवडीचे महत्त्व समजावून सांगितले . खुप छान प्रतिसाद आम्हाला मिळाला. 2030 पर्यंत हजारो एकर पडिक जमिनींवर बांबूलागवड करण्याचे नियोजन आम्ही केले आहे. अनेक शेतकरी आमच्या संपर्कात आहेत. काही गावांत बांबूलागवडीचे माॅडेल प्रोजेक्ट उभारण्यासाठी आम्ही स्थानिक पातळीवरील शेतकरी आणि नर्सरी उद्योजकांना आवाहन केले आहे. लवकरात लवकर हे छोटेखानी प्रकल्प सर्वांना पहायला मिळतील . कोकण बांबू मिशनच्या बांबूलागवड चळवळीत आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करावे ही आपणांस नम्र विनंती करित आहोत. एका मोठ्या विषयाची छोटी सुरुवात आम्ही केली आहे. 💐🙏💐
🎋 फायदा आणि फायदा देणारी बांबू शेती 🎋
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
⚜️ एकदा लागवड केली की पिढ्यान पिढ्या उत्पन्न मिळते .
⚜️ हवामान बदलाचा फारसा परिणाम या पिकावर होत नाही.
⚜️ लाकडाला उत्तम पर्याय म्हणून बांबूकङे पाहिले जाते.
⚜️ बांबूपासून ग्रीन कोळसा, इथेनॉल वगैरे उर्जा निर्माण केली जाते.
⚜️ फर्निचर उद्योग, हॅडिक्राफ्ट, प्लायवुड इंडस्ट्रीज, बांधकाम क्षेत्रात बांबू उपयुक्त आहे.
⚜️ शासनाने बांबूविषयात दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्सची सुरुवात केली आहे.
⚜️ बांबूपासून फेब्रिक्स तयार केले जाते, कापड उद्योगात याचा वापर होतो. आपल्याला उपयुक्त अशा हजारो वस्तू बांबूपासून तयार करतात.
⚜️ बांबू हे एक बहुपयोगी पिक आहे.
👍 कोकण विकासाच्या नुसत्या चर्चा करण्यापेक्षा आपण सर्वजण प्रत्यक्ष काम करूया . आम्ही सुरूवात केली आहे , आपणही सहभागी व्हा !
संजय शांताराम परब
🟧 कोकण उद्योग पर्यटन विकास संस्था. 🟧 कोकण ग्रीन वर्ल्ड .
मु. पोस्ट पेंडुर, ता. मालवण येथे मी माझ्या गणपती बाप्पांच्या डेकोरेशनच्या माध्यमातून बांबूलागवडीची जनजागृती करण्याचा देखावा साकारला होता. आपणांस आरती संग्रहाची PDF पाठवित आहे.त्यात बांबू विषयक थोडक्यात माहिती दिली आहे .
संपर्क : 9819584666
ब्युरो न्युज, कोकण नाऊ, मालवण