मालवणमध्ये रंगणार ”सिंधुरत्न श्री २०२३”

येत्या २२ फेब्रुवारी रोजी आयोजन

मालवण : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर्स यांच्या मान्यतेने सिंधुरत्न कला-क्रीडा मंडळ, मालवण आयोजित खुली जिल्हास्तरीय बॉडीबिल्डींग स्पर्धा ”सिंधुरत्न श्री २०२३” येत्या बुधवार, २२ जानेवारी २०२३ रोजी मामा वरेरकर नाट्यगृह-मालवण येथे होणार आहे.
या स्पर्धेचे हे ६ वे वर्ष असून सिंधुरत्न श्री विजेत्याला रोख रक्कम ३० हजार आणि मानाचा जरीपट्टा आणि आकर्षक चषक, बेस्ट पोझर ३००० / रु. मोक्स्ट इम्पवृड : ३००० रु. बेस्ट आकर्षण तसेच प्रत्येक गटातील १ ते ५ क्रमांकाना बक्षिसे असतील. यामध्ये वजनी गट ५५ ते ६० किलो : प्रथम : ५०००/- रु. गोल्ड मेडल-प्रमाणपत्र, ट्रॉफी, ६० ते ६५ किलो : द्वितीय क्रमांक: ४५००/- रु. सिल्वर मेडल, प्रमाणपत्र, ट्रॉफी, ६५ ते ७० किलो : तृतीय क्रमांक ४०००/- ब्राँझ मेडल, प्रमाणपत्र, ट्रॉफी, ७० ते ७५ किलो : चतुर्थ क्रमांक ३५०० रु. आणि प्रमाणपत्र तसेच पाचवा क्रमांक ३०००/- रु. आणि प्रमाणपत्र असणार आहेत. स्पर्धेसाठी वेळ, वजन तपासणी संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत होईल. अधिक माहितीसाठी रुपेश सातार्डेकर ९४२३०७११७७, अमोल सावंत ९४२३३०४३३४, मिथुन शिगले ८३२९३६२८८३ आणि मुन्ना झाड ९४२३६८६०६७ यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / मालवण

error: Content is protected !!