अणाव गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ! : आमदार वैभव नाईक यांचे आश्वासन

जलजीवन मिशन योजनेतून आमदार वैभव नाईक यांचा कुडाळ तालुक्यात कामाचा धडाका

कुडाळ : जलजीवन मिशन योजनेतून मंजूर सार्वजनिक विहीर व नळयोजना कामाचा भूमिपूजन सोहळा आज आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील उपवडे, झाराप आणि अणाव या गावांमध्ये करण्यात आला.
अणाव गावच्या विकासासाठी आपण नेहमीच निधी देत असतो. जलजीवन मिशन योजना पुढील २० वर्षे राबविण्यात येणार असून गावच्या सरपंच आणि सदस्यांनी याचे नियोजन योग्य पद्धतीने करावे. कामाची गुणवत्ता राहिली पाहिजे. अणाव गावात विकासकामांसाठी निधी दिला असून येथील रस्ते, ब्रिज सुद्धा पूर्ण होतील, असे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिले. यावेळी सरपंच लीलाधर अणावकर, उपसरपंच आदिती अणावकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव, बबन बोभाटे, बंड्या कोरगावकर, सदस्य श्रद्धा दळवी, ग्रामसेवक सुनील वारंग, समीर पालव, गजानन कुलकर्णी, सुनील अणावकर, तंटामुक्ती अध्यक्ष विकास अणावकर, प्रताप पालव, बाळू पालव, दीपक आंगणे, समीर पालव, दिपसेन सावंत, रुपेश शिरोडकर, शिवराम अणावकर, सुरेश पवार, बाबा परब, अमोल पालव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!