वरुण सरदेसाई ११ रोजी सिंधुदुर्गात

६ ठिकाणी होणार कॉलेज कक्ष उदघाटन

प्रतिनिधी । कुडाळ : युवासेना सचिव वरुण सरदेसाई दिनांक ११ सप्टेंबर वर्जी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 ठिकाणी कॉलेज कक्ष उद्धाटन करण्यासाठी येणार आहेत. या कार्यकमात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, युवासेना विस्तारक अमित पेडणेकर, युवतीसेना विस्तारक रुची राऊत, संजय पडते, संदेश पारकरउपस्थित राहणार आहे. या दौऱ्यात वरुण सरदेसाई युवकांशी संवाद साधणार असून युवा सेनेतील पदाधिकारी नियुक्ती देखील करण्यात येणार आहे. सर्व युवासेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी केले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!