श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कलमठमध्ये रंगणार आमने-सामने ‘डबलबारी’चा महासामना!

बुवा मकरंद मोडक आणि बुवा स्वप्नील गोसावी यांच्यात रंगणार भजनांचा जंगी मुकाबला

कणकवली : प्रतिनिधी — श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कणकवली तालुक्यातील कलमठ (लांजेवाडी) येथे शुक्रवार,दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ठीक ९ वाजता भक्तिरसाने न्हाऊन निघणारा ‘डबल बारी – भजनांचा महासामना’ आयोजित करण्यात आला आहे. भजनप्रेमींसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षणाचा ठरणार आहे.
या डबलबारी साठी आई मोराई प्रासादिक भजन मंडळ,बोर्डेवे कणकवली चे बुवा श्री.मकरंद मोडक आणि श्री.पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, दारिस्ते कणकवली चे बुवा श्री.स्वप्नील गोसावी यांच्या यांच्यात रंगतदार असा हा कार्यक्रम होणार आहे.
बुवा मकरंद मोडक यांच्या साथीला पखवाज योगेश सामंत तर तबला गजानन देसाई साथ देणार आहेत. तर बुवा स्वप्नील गोसावी यांना पखवाज मनीष घाडी आणि तबल्यावर गोपाळ नालंग यांची साथ लाभणार आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्साहात रंगणाऱ्या या आमणे सामने भजनांच्या महासामन्याचा आनंद घेण्यासाठी परिसरातील भजनप्रेमी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजक श्री.बाबू नारकर यांनी केले आहे.

स्थळ श्री.बाबू नारकर यांचे निवासस्थान, कलमठ (लांजेवाडी), ता. कणकवली
दिनांक : शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६
वेळ : रात्री ठीक ९.०० वाजता

error: Content is protected !!