पाणी तपासणी शिबिराला आचरा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा,विरण मसुरे,कट्टा येथील शिबिरात सुमारे 200व्यापा-यांनी लाभ घेतला
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या सहकार्याने आणि आदर्श व्यापारी संघटना आचरा च्या माध्यमातून 1सप्टेंबर रोजी लौकीक सभागृह येथे अन्न व खाद्य पदार्थांशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांसाठी पाणी व अन्न पदार्थ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याला व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कट्टा, विरण मसुरे व आचरा येथे घेण्यात आलेल्या या शिबिरात सुमारे 200च्या आसपास व्यावसायिकांनी आपली पाणी तसेच अन्न पदार्थ तपासणी करण्या साठी नमुने पाठवले. अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत अन्न व खाद्यपदार्थांच्या उत्पादनासाठी वापरले जात असलेले पाणी हे प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. आपण उत्पादित करीत असलेल्या पदार्थाचे सुक्ष्मजीवाणू परिक्षण (मायक्रोबायोलॅाजीकल टेस्ट) व पोषणमुल्य(न्यूट्रीशन व्हॅल्यू) ही प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. वरील दोन्ही बाबी लक्षात घेवून व्यापारी महा संघाने सवलतीच्या दरात अभियान आयोजित केले होते. आचरा येथे या शिबिराची सुरुवात महासंघाचे माजी कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर यांच्या उपस्थितीत झाले या वेळी आचरा येथे घेण्यात आलेल्या अन्न सुरक्षा प्रशिक्षणाच्या प्रमान पत्रांचेही वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाला अरविंद नेवाळकर, आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष मंदार सांबारी, परेश सावंत, खजिनदार जयप्रकाश परुळेकर, संदीप पांगम.सचिन गुळगुळे,रुपम टेमकर यांसह बहुसंख्य व्यापारी बांधव आदी उपस्थित होते.






