वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ लंपास करणाऱ्या आरोपीला एलसीबीने डोंबिवली मध्ये केले जेरबंद

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कौतुकास्पद कारवाई

शिरगाव मधील संशयित आरोपीवर यापूर्वी आहेत गुन्हे दाखल

शिरगाव साटमवाडी या ठिकाणी जयश्री सदाशिव बावसकर, रा. शिरगांव, साटमवाडी यांचे गळ्यातील एक लाख 75 हजार रुपये किमतीची 25 ग्रॅम सोन्याची माळ खेचून लंपास केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने तन्मय राजेंद्र साटम, वय 29 वर्षे, मुळ रा.शेवरे, शिरगांव, ता.देवगड, सध्या रा.दोन टाकी, धर्मा चाळ, गरीबाचा वाडा, डोंबिवली (प), याला डोंबिवली, गणेशनगर परिसरातून सापळा लाऊन शिताफीने जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या या कारवाईबद्दल या पथकाचे कौतुक केले जात आहे. सदर गुन्हेचा तपास करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे तसेच सीसीटीव्ही फुटेज, तसेच तांत्रिक तपासाव्दारे तपास करत असताना आरोपी पर्यंत सानिक गुणांविषयी विभागाचे पोलीस पोचत त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने यापूर्वी शीळ डायघर पोलीस ठाणे, ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत मंदिर दानपेटी चोरीचा गुन्हा केला असून सदर गुन्ह्यात आरोपी हा पोलिसांच्या रडावर होता. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सनिल पाटील,राजेंद्र जामसंडेकर, पोलिस हवालदार, ज्ञानेश्वर तवटे, आशिष गंगावणे, किरण देसाई यांच्या पथकाने केलेली आहे. या कारवाई बद्दल पोलीस पथकाचे कौतुक केले जात आहे.

error: Content is protected !!