अखेर माणगावला मिळाले महावितरण शाखा अभियंता

समेध उपाध्ये यांनी स्वीकारला पदभार

पं. स. सदस्य योगेश धुरी यांच्या पाठपुराव्याला यश

मे महिन्यापासून रिक्त असलेले माणगाव महावितरण कार्यालयातील शाखा अभियंता हे पद भरण्यात आले आहे. त्यासाठी पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी पाठपुरावा केला होता. समेध उपाध्ये यांनी शाखा अभियंता म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांचे स्वागत करून त्याना शुभेच्छा देण्यात आल्या.
मे महिन्यापासून हे पद रिक्त होते. त्यामुळे माणगाव खोऱ्यातील विविध गावांमधील वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या सोडविताना अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत आवाज उठवत हे पद तातडीने भरण्याची मागणी केली होती.
यानंतर महावितरणचे श्री. राख साहेब तसेच सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे मुख्य अभियंता श्री. डोहे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या प्रक्रियेदरम्यान माणगाव शाखा अभियंता पदाच्या नियुक्तीची ऑर्डर तब्बल चार वेळा बदलण्यात आली. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून समेध उपाध्ये यांनी माणगाव शाखा अभियंता म्हणून पदभार स्वीकारला आहे.
श्री. उपाध्ये यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. सुकी गुरुजी यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभागप्रमुख एकनाथ धुरी, उपविभागप्रमुख शैलेश वीरनोडकर तसेच शहरप्रमुख सचिन भिसे उपस्थित होते.
माणगाव शाखा अभियंता पदावर नियुक्ती झाल्यामुळे परिसरातील वीज ग्राहकांच्या समस्या अधिक जलदगतीने मार्गी लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!