गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटणार ‘सायकल’मुळे हास्य !

कुडाळ हायस्कूलमध्ये उद्या १०० विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण
आमदार निलेश राणेंच्या हस्ते सोहळा
येथील कुडाळ हायस्कूल-ज्युनियर कॉलेजमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासासाठी मोठी मदत मिळणार असून, तब्बल १०० विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात येणार आहे. नवी मुंबईचे शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर आणि शिवसेना उपशहरप्रमुख महेश परब यांच्या माध्यमातून व सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या सायकलींचे वितरण २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ हायस्कूल-ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत, कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
गरजू विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध करून देण्यासाठी संजयजी पडते आणि अनंत वैद्य यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. सायकली मिळाल्यामुळे ग्रामीण भागातून शाळा-कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला याचा निश्चितच हातभार लागणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची प्रसिद्धी व सहकार्य करावे, असे आवाहन कुडाळ हायस्कूल-ज्युनियर कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे.






