पूर्णानंद महिला मंच च्या वतीने कणकवली शहरात स्थानिक महिला उद्योजिका निर्मित वस्तूंचे एक दिवसीय प्रदर्शन आणि विक्री

गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुवर्णसंधी

येत्या गणेशोत्सवाचे निमित्ताने पूर्णानंद महिला मंच, कणकवली या नोंदणीकृत मंडळाने कणकवली शहरात स्थानिक महिला उद्योजिका निर्मित वस्तूंचे एक दिवसीय प्रदर्शन आणि विक्री रविवार दिनांक ०६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित केली आहे. सदर प्रदर्शन व विक्री मुंबई गोवा महामार्गालगत एकदंत प्लाझा मधील तळमजल्यावर आयोजित केले असून मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी येणे-जाणे अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे.
या प्रदर्शनात नैवेद्याचे पदार्थ, लाडू-करंजी-शंकरपाळी आदि फराळाचे पदार्थ, तयार कपडे, पर्स, रांगोळ्या, मसाले, अगरबत्ती-धूप-कापूर, काजुगर, मेहंदी कोन, उकडे तांदुळ, मोदक पीठ व तत्सम पीठे, सजावटीच्या अनेकविध वस्तु, कृत्रिम दागिने, आमरस, सेंद्रिय गूळ, नारळ सुपारी, भाजी आमटीचे तयार ओले वाटण अशा सणाच्या दृष्टीने आवश्यक अशा विविध वस्तू असणार आहेत. या सर्व वस्तु स्थानिक महिलांनी उत्तम दर्जाच्या कच्च्या मालापासून बनविलेल्या असणार आहेत.
जिल्ह्याबाहेरुन आलेल्या अनेक उत्पादकांनी शहरात लोकांना आकर्षित करणा-या जाहिरातीद्वारे विक्री प्रदर्शने भरविली असून त्यापेक्षा स्थानिक महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या वस्तु खरेदी करुन त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे. तरी ग्राहकांनी या प्रदर्शन-विक्री महोत्सवास अवश्य भेट देऊन दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!