कणकवली कंझ्यूमर्स सोसायटीच्या वतीने आनंदाच्या शिधाचे वितरण

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते कार्डधारकांना वाटप
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून आनंदाच्या शिधा चे वितरण
गणेशाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून रेशन दुकानावर आनंदाचा शिधा प्राप्त झाला असून कणकवलीतील कंझ्यूमर्स सोसायटी मार्फत या शिधाचे वितरण करण्यात आले. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत सोसायटीचे चेअरमन संदीप नलावडे, शहराध्यक्ष तथा व्हाईस चेअरमन अण्णा कोदे, रेशन दुकानदार रुपेश पेडणेकर, संचालक महेश नार्वेकर, राजन परब आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली