नेरूरमध्ये रंगणार भव्य दहीहंडी स्पर्धा

विजेत्या गोविंदा पथकाला १५ हजारांचे पारितोषिक

नेरूर येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रणझुंजार मित्र मंडळ, नेरूर’ आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कलेचा देव कलेश्वर दहीहंडी स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नेरूर चव्हाटा येथील हनुमान मंदिर प्रांगणात होणार आहे. त्यामुळे परिसरातील गोविंदा पथकांमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
स्पर्धेतील विजेत्या गोविंदा पथकांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पथकाला १५ हजार रुपये रोख व आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांकाच्या पथकाला ७ हजार ५०० रुपये रोख व आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे.
व या दहीहंडी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गोविंदा पथकांनी नोंदणी व अधिक माहितीसाठी संतोष परब (७२६३००३०९७), कल्पेश मार्गी (८३९०६१६७६०) किंवा प्रविण नेरुरकर (९४२२९४८०२४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रणझुंजार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!