प्रभाग क्रमांक 10 मधील महिलांसाठी श्रावणमास निमित्त देवदर्शन एक दिवसीय सहल

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते सहलीचा शुभारंभ
प्रभाग क्रमांक 10 मधील महिलांसाठी श्रावण मास निमित्त देवदर्शन एक दिवसीय सहल आयोजित करण्यात आले होते. सहलिचे नियोजन शीतल मांजरेकर यांनी केले. सकाळी 10 वाजता नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रदिप मांजरेकर उपस्थित होते. प्रथम रेडीचा गणपती, माऊली मंदिर, आरवलीचा वेतोबा, सातेरी मंदिर, सागरेश्वर वेंगुर्ला अशी देवदर्शन पूर्ण करण्यात आले. महिलांनी याचा मनमुराद आनंद घेतला.






