श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे सामुहिक सत्यनारायण महापूजचे आयोजन

गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर 2026 सद्गुरू श्री श्री 108 महंत श्री गावडे काका महाराज यांचे आगमन व मार्गदर्शन
श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट मालवण, या मठात प्रती वर्षा प्रमाणे. याही वर्षी श्रावण मास निमित्त गुरुवार दि. 3 सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ८ : ०० वा. श्री सत्यनारायण महोत्सव सामुहिक श्री सत्यनारायण महापू आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक, भक्तांनी दर्शन, तीर्थ – प्रसाद, आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा. अशी विनंती मठाच्या वतीने करण्यात आली आहे. यानिमित्त कार्यक्रम सकाळी ८ वा. सामूहिक श्री सत्यनारायण महापूजा सकाळी १० वा. महाआरती, दुपारी १२ वा. श्री १०८ महंत मठाधीश प. पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मागदर्शन, दुपारी १ वा. महाप्रसाद-अन्नदान दुपारी 3 .00 वा. सिध्देश म्हापणकर मुणगे यांचे सुस्वर संगीत गायन, सायंकाळी ७ :०० वा. दैनंदिन आरती रात्रौ ठिक ७ :४५ वा. भजन श्री देवी सातेरी प्रासादिक दिंडी भजन मंडळ – वेरळ, ता. मालवण आपला श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजि.






