विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक पिराजी जिवबा कांबळे यांना”नेशन बिल्डर अवॉर्ड प्राप्त.

कणकवली/मयुर ठाकूर
रोटरी क्लब कणकवली शाखेने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली या संस्थेतील कणकवली कॉलेज व विद्यामंदिर माध्य प्रशाला कणकवली येथिल तीन रत्नांची पुरस्कारासाठी निवड केली . कोणताही प्रस्ताव नाही की परीक्षा मुलाखत नाही रोटरीने केवळ या तिन्ही शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी असणारी तळमळ व कामाची निष्ठा अजमवली . कणकवली कनिष्ठ महाविद्यालयातील गणित अध्यापक श्री अमृते सर आपल्या विषयामध्ये निष्णांत आहेत. तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी स्वतः कष्ट घेऊन गणिता सारखा अवघड विषय सुलभ करून अध्यापन करणे सरांचा हातखंडा आहे. गणित हा विषय असा आहे की जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापून टाकणारा विषय अमृते सरांनी सर्वांच्या मनापर्यंत नेऊन ठेवला अनेक विद्यार्थी नीट ‘ जीईई परीक्षा सहज उत्तीर्ण होऊन अनेक क्षेत्रात स्थिर झाले आहेत . शांत आणि संयमी स्वभावाचे अमृते सर अभ्यासाच्या बाबतीत कठोर आहेत. सेवाभाववृत्तीने समाजाच्या काळजापर्यंत सरांनी गणित पोहचून तर्कशक्ती जागृत केली सतत विविध प्रयोग करणारे अमृते सर आदर्श शिक्षक म्हणून सर्वांचे लाडकेच आहेत .
वरिष्ठ महाविद्यालयाचे डॉ गावडे सर वनस्पती शास्रांचे गाढे अभ्यासक आहेत निसर्गातील विविध वनस्पतींचा शोध घेणे सरांचा छंद आहे दुर्मिळ वनस्पती शोधून सर्व सामान्य जनतेला वृत्तपत्राच्या माध्यमातून समजून देणे हा महत्चाचा गुण सरांचा आहे कणकवली महाविद्यालयात वनस्पतीशास्राची विद्यार्थ्यांमध्ये अभिरूची वाढवून विद्यार्थी प्रिय असणारे अभ्यासक म्हणून सरांची ख्याती प्रसिद्ध आहे . साधी रहाणी सर्वांत मिसळण्याची वृत्ती आणि निसर्ग भ्रमंतीचा छंद गावडे सरांनी जोपासून वनस्पती शास्त्र सर्व सामान्य जनतेला सुगम करून दिल्यामुळे आदर्श शिक्षक खरोखरच राष्ट्र बांधणीसाठी किती महत्चाचे योगदान करू शकतात याचे उत्तम उदाहरण रोटरी क्लबने ओळखून सरांचा गौरव केला यांचा अभिमान वाटतो .
विद्या मंदिर माध्य. प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर मराठी विषयाचे पीएचडी असलेले माध्यामिक विभागाचे प्रमुख म्हणून गेले तीन महिने धुरा सांभाळत आहेत . मराठी विषयांवर प्रचंड प्रभुत्व असल्याने किशोर वयीन विद्यार्थ्यांना मराठी वाङ्मयाची अभिरूची निर्माण करून भाषेची जाण तयार केली मराठी व्याकरण ‘ लेखन कौशल्य , व्यवहारिक मराठी याची गोडी विद्यार्थ्यापर्यंत मोठ्या मेहनतीने पोहचवली . वक्तृत्व ‘ कला निबध वाङ्ममय सुलभ रितीने विद्यार्थांपर्यंत पोहचविले . विविध शोध निबंध व संशोधनपर ग्रंथाचे लेखन सरांचे प्रसिद्ध आहे. वृत्तपत्रातून स्फुट लेखन ‘ समाज प्रबोधनपर व्याख्याने ‘ या माध्यमातून लोकप्रबोधन चळवळीमध्ये सहभाग ‘ अनेक उपक्रम राबवून विद्यामंदिरचा शैक्षणिक कायापालट करून आदर्श निर्माण केल्यामुळे रोटरी क्लबने शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षकणिक संकुलातील शिक्षक दिनांचे निमित्ताने ही तीन रत्ने शोधून गौरव केला . याचा खूप खूप अभिमान वाटतो . असेच शैक्षणिक कार्य या तीनही रत्नांच्या हातून घडत राहो .. ही रोटरी क्लब मार्फत शुभेच्छा !!