जिल्हास्तरीय ‘उड्डाण’ महोत्सवात दळवी महाविद्यालयाचे यश
पथनाट्य स्पर्धेत दळवी महाविद्यालय जिल्ह्यात प्रथम
खारेपाटण : तळेरे, येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने नुकत्याच संपन्न झालेल्या ‘उड्डाण’ महोत्सवात पथनाट्यात प्रथम क्रमांक पटकावला. या निमित्ताने दळवी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या माध्यमातून कणकवली कॉलेज कणकवली येथे जिल्हास्तरीय उडान महोत्सव नुकताच संपन्न झाला. यात दळवी महाविद्यालयाने ‘नाश अनिष्ट प्रथांचा अधोगतीच्या मुक्तीचा’ या विषयावर पथनाट्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.
यात बीएएमएमसी, बीएस्सी-आयटी, बीबीआय, बीएमएस, बीएएफच्या अंतीम वर्षातील विद्यार्थी राकेश राठोड,दीप पारकर,सुनील चव्हाण,सत्यवान गावकर,चैतन्य,मुशरफ काझी,साकी मानाजी, कृष्णकुमारी इस्वलकर,ज्योती कदम, शारदा साटम,आदिती पाताडे, वृषाली ळायले, सोनाली सापळे यांचा सहभाग घेतला होता. यांना श्री.शेखर गवस यांचे मार्गदर्शन लाभले. या यशा बदल महाविद्यालयाचे मानद मार्ग निर्देशक श्री. विनायक दळवी, समन्वयक श्री. श्रीपाद वेलींग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
अस्मिता गिडाळे / कोकण नाऊ / खारेपाटण