उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे गाजर गवत जागृती सप्ताह

प्रतिनिधी । कुडाळ : उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. जी. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गाजर गवत जागृती सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहा दरम्यान गाजर गवत, रानमोळी इत्यादी प्रकारचे तण निमूर्लन केले गेले. यामुळे फळ भाजीपाला व इतर पिकांना पोषक द्रव्य मिळवण्यासाठी मदत होते. यामध्ये सर्व लहान मोठया तणाचे निमूर्लन करुन महाविद्यालयाचे प्रक्षेत्र स्वच्छ करण्यात आले.
या सप्ताहा दरम्यान सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. जी. खांडेकर यांनी विद्यार्थ्यांना तणांचे र्निमूर्लन करणे किती आवश्यक आहे या विषयावर मार्गदर्शन केले. या सप्ताहा प्रसंगी सहयोगी अधिष्ठाता, प्राध्याक वर्ग, अधिकारी / कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!