आमदार नितेश राणेंचा ठाकरे गटाला धक्का

दिगवळे सरपंच संतोष घाडीगांवकर भाजपा मध्ये
आ.नितेश राणे यांनी ठाकरे अजून एक धक्का दिला असून कणकवली तालुक्यातील दिगवळे गावचे ठाकरे गटाचे विद्यमान सरपंच संतोष घाडीगांवकर यांनी आज ओम गणेश बंगल्यावर भाजपात पक्षप्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून गावची विकासकामे होऊ शकतात.गावातील रस्ते, मंदिर विकास तसेच पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आमदार नितेश राणेच भरीव विकासनिधी देऊ शकतात. गावाच्या विकासासाठी आपण आमदार नितेश राणेंच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत भाजपात दाखल झाल्याचे सरपंच घाडीगांवकर म्हणाले. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत, सौ संजना सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राजेश पवार ग्रा. पं सदस्य, सौ.अनुजा पवार ग्रा.पं सदस्य, सौ. रेश्मा खांडेकर ग्रा पं सदस्य, सौ. मनिषा केरे ग्राम.सदस्य, किरण गावकर, ज्योती गावकर, सौ संजना चव्हाण, हरिश्चंद्र परब, महेश पवार, गणेश कुबल, सतीश सावंत, संदीप चव्हाण, बाबू घाडी आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी





