कणकवलीत स्वरानी नेरकर हिचा गड नदीत बुडून मृत्यू

आत्महत्या केली असण्याची शक्यता तहसीलदार कचेरी मध्ये जाते असे घरात सासूला सांगून घरातुन सकाळी 11 वाजता निघून गेलेली स्वरानी सचिन नेरकर (33 तेली आळी कणकवली) हिचा मृतदेह कणकवली गडनदीपात्रात मराठा मंडळ नजीकच्या नदीच्या बंधाऱ्याला अडकलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार…

Read Moreकणकवलीत स्वरानी नेरकर हिचा गड नदीत बुडून मृत्यू

आचरा पोस्ट कर्मचारी सुनिल घाडी यांचे निधन

आचरा पोस्ट ऑफिस कर्मचारी आणि चिंदर गावठणवाडी येथील राहिवासी सुनिल वसंत घाडी यांचे शुक्रवारी मुंबई येथे आकस्मित निधन झाले. ते 52 वर्षाचे होते. आचरा पोस्ट ऑफिस येथे सध्या ते कार्यरत होते. आकारी ब्राम्हण देव प्रासादिक भजन मंडळ चिंदर गावठणवाडीचे भजनी…

Read Moreआचरा पोस्ट कर्मचारी सुनिल घाडी यांचे निधन

मालवण तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि सी एस सी सेवा केंद्र यांच्या व्ही. एल. ई सेवा संघ मालवणच्या अध्यक्ष पदी सुनील खरात

मालवण तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि सी एस सी सेवा केंद्र यांच्या व्ही. एल. ई सेवा संघ मालवणच्या अध्यक्ष पदी सुनील खरात, आचरा यांची तर सचिव पदी जितेंद्र भगत, चौके यांची सर्वानुमते निवड करण्यात…

Read Moreमालवण तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि सी एस सी सेवा केंद्र यांच्या व्ही. एल. ई सेवा संघ मालवणच्या अध्यक्ष पदी सुनील खरात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी आयोजित शिबीरात चारशेच्या वर प्रस्ताव सादर

भाजप तर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी आचरा येथे सलग दोन दिवस दोन ठिकाणी आयोजित केलेल्या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत एकूण 416प्रकरणे केली गेली. शनिवारी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी या शिबिरांना भेट देत कार्यकर्ते आणिजेष्ठनागरीक संघटनेचे पदाधिकारी…

Read Moreमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी आयोजित शिबीरात चारशेच्या वर प्रस्ताव सादर

विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढवा-बाबाजी भिसळे

नव्या वातावरणात नव्या जोमाने शिक्षण हेच आपले ध्येय घेऊन उज्वल यशातून शाळेचे आणि आपल्या गावाचे नावलौकिक वाढवा असे आवाहन आचरा हायस्कूल स्कूल समितीचे बाबाजी भिसळे यांनी आचरा हायस्कूल येथे केले. न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे स्वागत आणि शैक्षणिक साहित्य…

Read Moreविद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढवा-बाबाजी भिसळे

कूपरचे डिन डॉ. शैलेश मोहिते आणि सहकाऱ्यांचा” कोकण कट्टा” तर्फे सत्कार

मुंबई (प्रतिनिधी)विलेपार्ले पश्चिम येथील कुपर रुग्णालयात मुंबईतील पहिली मेंदूतील दुर्मिळ डिजिटल सुबट्रक्शन ऍन्जोग्राफी शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या *डीन डॉ शैलेश मोहिते ,* *न्यूरोलॉजिस्ट डॉ प्रद्युम्न ओक ,आणि सहकारी* यांचं मनस्वी अभिनंदन. करण्यासाठी कोकण कट्टा सदस्य कुपर रुग्णालयात मोहिते सरांची सदिच्छा भेट…

Read Moreकूपरचे डिन डॉ. शैलेश मोहिते आणि सहकाऱ्यांचा” कोकण कट्टा” तर्फे सत्कार

अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त

अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त मसुरे प्रतिनिधीकालावल खाडी गडनदी किनारी मसुरे मर्डे परिसरातील मर्डे, डांगमोडे, कोईल-बांदिवडे येथील अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले एकूण २४ वाळू रॅम्प श्री.सुहास चव्हाण मंडळ अधिकारी मसुरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीम. वर्षा झालटे तहसीलदार मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read Moreअनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त

कोकण पदवीधर मतदार नोंदणीसाठी २८ मे पर्यंत मुदत : सध्या १७४८४ मतदार.

२६ जून रोजी मतदान: जिल्हात २५ मतदान केंद्र.

जिल्हाधिकारी किशोर तावडे
ओरोस(प्रतिनिधी)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक जानेवारी २०२४ रोजी  १७४८४ पदवीधर मतदार नोंदणी झालेली मतदार यादी  प्रसिद्ध झाली आहे. तर ६५७ पदवीधर मतदारांचे अर्ज  ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने दाखल झाले आहेत.  अजूनही पदवीधर मतदारांना नाव नोंदणी करण्याची संधी असून  पात्र असलेल्या पदवीधारकांनी दिनांक  २८ मे २०२४ पर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन नमुना १८ भरून मतदार नोंदणी करू शकतात. जिल्ह्यात २१ मतदान केंद्र असून वाढलेल्या मतदारांमुळे आणखी चार केंद्रे वाढवून  एकूण पंचवीस मतदान केंद्राच्या मंजुरीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आल्याची माहिती  जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी  बालाजी शेवाळे उपस्थित होते.
   महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघातील आमदार  निरंजन डावखरे  यांची मुदत ७ जुलै २०२४  रोजी संपणार आहे. या जागेसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ३१ मे रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार असून ७ जून  पर्यंत नामनिर्देशन पत्र   सादर करण्याचा अखेरचा दिनांक आहे.  १० जून छाननी, १२ जून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक, २६ जून  सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान, १ जुलै रोजी मतमोजणी व ५ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक असा हा निवडणूक कार्यक्रम आहे.
        मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एक जानेवारी 2024 ला अंतिम करण्यात आलेल्या पदवीधर मतदारांच्या यादीत 17,484  पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे. 1  जानेवारी 2024 नंतर ऑफलाइन 106  ११ व १२ मे रोजी घेतलेल्या कॅम्प मध्ये 155  व ऑनलाइन 396  असे एकूण 657 नवीन अर्ज दाखल झाले आहे. 28 मे पर्यंत  रात्री बारा वाजेपर्यंत  पात्र पदवीधर  मतदारांना  ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तसेच ऑफलाइन नोंदणी करता येईल  असेही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगितले.
              पूर्वीची 21 मतदान केंद्र असून  कणकवली कुडाळ वेंगुर्ला या ठिकाणी मतदारांची संख्या वाढल्यामुळे  तहसीलदार कार्यालयात असलेल्या या मतदान केंद्रांना सहाय्यक मतदान केंद्र दिले जाणार आहे  त्यामुळे आणखी चार मतदान केंद्रात वाढ होईल व ती एकूण 25 केली जातील व तसा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आल्याचे ही जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगितले.

Read Moreकोकण पदवीधर मतदार नोंदणीसाठी २८ मे पर्यंत मुदत : सध्या १७४८४ मतदार.

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण : श्रावणी कंप्युटर, अक्षरोत्सव परिवाराचे आयोजनविचारच माणसाला मोठे करू शकतात : प्रणय शेट्ये तळेरे, (प्रतिनिधी)आपण करीत असलेल्या कामामुळे आपली ओळख होणे महत्त्वाचे असून आपण आपले छंद जोपासले पाहिजेत. विचार माणसाला मोठे करू शकतात आणि तेच…

Read More

संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाच्या  दोन  विद्यार्थ्यांची “इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड”  कंपनीमध्ये निवड जयसिंगपूर:(प्रतिनिधी)  शिक्षण क्ष्रेत्रात आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात निर्माण केलेले संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागातील सिव्हील  इंजिनीरिंगच्या आर्यन शिंगे, जयंत दीक्षित या दोन विद्यार्थ्याची ‘इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड’ …

Read More

*⛳ दुण्डागडावरील माहितीफलकांचे अनावरण⛳*
देवगड/चाफेड (प्रतिनिधी)
           देवगड तालुक्यात चाफेड येथील दुण्डागडावर दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थांच्यावतीने गडावर जाणाऱ्या वाटेवर तसेच महत्वाच्या वास्तूंच्या ठिकाणी माहितीदर्शक फलक लावण्यात आले.
          सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे अनेक गडकिल्ले आहेत जे काळाच्या ओघात विस्मरणात गेलेले आहेत. अशातीलच एक गड म्हणजे दुण्डागड. या दुण्डागडावर चाफेड ग्रामस्थ व दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत फेब्रुवारीपासून संवर्धन मोहिमांतर्गत गडावरील वास्तूंची स्वच्छता व संवर्धन करण्यात आले. दुण्डागडावर भेट देणाऱ्या दुर्गप्रेमींच्या सोयीसाठी गडावर जाणाऱ्या वाटेवर मार्गदर्शकफलक तसेच महत्वाच्या ठिकाणासाठी नामफलक आवश्यक होते. यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व चाफेड ग्रामस्थमार्फत मार्गदर्शक फलक लावण्यात आलेत. यामध्ये गडावर जाणाऱ्या मार्गांवर पाच फलक, घोड्याची पाग, दुर्गाचा चाळा, राजवाडा, विहीर, मुख्य दरवाजा, बुरुज याठिकाणी सहा असे एकूण अकरा फलक यावेळी लावण्यात आले.
          या मोहिमेला चाफेड सरपंच किरण मेस्त्री, महेश परब, साईल पांचाळ, संतोष साळसकर, आकाश राणे, प्रदिप घाडी हे ग्रामस्थ तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गणेश नाईक, समिल नाईक, हृदयनाथ गावडे, उत्कर्षा वेंगुर्लेकर, हेमलता जाधव, प्रसाद पेंडूरकर, जालिंदर कदम, वेदांत वेंगुर्लेकर, ऋतुराज सावंत, अक्षय जाधव, प्रविण नाईक आदी उपस्थित होते.
          साईप्रसाद मसगे, उत्कर्षां वेंगुर्लेकर, स्मिता जाधव, सुजल ऍग्रो केअर मार्ट, हेमलता भास्कर जाधव, समीक्षा मोहन माळकर, स्मिता सुनिल कोदले, साक्षी खरात, आरती मकरंद वायंगणकर, विजय सावंत,अभिनव रामचंद्र भिंगारे, संगम श्रीकृष्ण चव्हाण यांनी मार्गदर्शक फालकांसाठी तसेच चाफेड ग्रामपंचायत सरपंच किरण मेस्त्री यांनी फालकांच्या पोलांसाठी तसेच सिमेंट, वाळू, खडी यांच्यासाठी सौजन्य केले. अल्पोपहार व भोजनाची सोय हेमालता जाधव यांनी केली सर्वांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

Read More*⛳ दुण्डागडावरील माहितीफलकांचे अनावरण⛳*

error: Content is protected !!