उज्वल यश संपादन करत दात्यांचा सन्मान वाढवा- जेएम फर्नांडिस

दात्यांनी दिलेल्या दातृत्वाचा सन्मान विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करून करण्याचे आवाहन जेष्ठ नागरिक संघाचे जे एम फर्नांडिस यांनी प्राथमिक शाळा गाउडवाडी येथे केले.गाउडवाडी ग्रामस्थ जगदीश नागवेकर यांनी दिलेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते गाउडवाडी प्राथमिक शाळेच्या मुलांना करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष बाबाजी भिसळे,ग्रामपंचायत सदस्य बबलू गावकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ सेजल आचरेकर,सौ ज्योती पवार, सौ बांगर आदी उपस्थित होते.
आचरा, अर्जुन बापर्डेकर





