मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी आयोजित शिबीरात चारशेच्या वर प्रस्ताव सादर
भाजप तर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी आचरा येथे सलग दोन दिवस दोन ठिकाणी आयोजित केलेल्या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत एकूण 416प्रकरणे केली गेली. शनिवारी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी या शिबिरांना भेट देत कार्यकर्ते आणिजेष्ठनागरीक संघटनेचे पदाधिकारी यांना धन्यवाद व्यक्त केले.
यावेळी त्यांच्या सोबत मालवण तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गांवकर,महेश मांजरेकर, जयप्रकाश परुळेकर,बाबू कदम,कैलास गुरव यांसह अन्य मान्यवर तसेच जेष्ठ नागरिक संघाचे अशोक कांबळी, लक्ष्मण आचरेकर, बबन बापर्डेकर, सुगंधी गुरव, मनाली फाटक आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील पात्र महिलांना मुख्यमंत्री
माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळावा त्यांचे प्रस्ताव सहज सुलभ परीपुर्ण व्हावेत याहेतूने आचरा भाजप तर्फे शुक्रवार शनिवार असे दोन दिवस ग्रामपंचायत आणि आचरा तिठा येथे शिबिराचे आयोजन केले होते. दोन्ही दिवस महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत या शिबिराच्या माध्यमातून प्रस्ताव सादर केले. यासाठी मोफत झेरॉक्स व्यवस्था ही केली गेली होती.
आचरा, अर्जुन बापर्डेकर