कणकवलीत स्वरानी नेरकर हिचा गड नदीत बुडून मृत्यू

आत्महत्या केली असण्याची शक्यता

तहसीलदार कचेरी मध्ये जाते असे घरात सासूला सांगून घरातुन सकाळी 11 वाजता निघून गेलेली स्वरानी सचिन नेरकर (33 तेली आळी कणकवली) हिचा मृतदेह कणकवली गडनदीपात्रात मराठा मंडळ नजीकच्या नदीच्या बंधाऱ्याला अडकलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार प्राथमिक चौकशीत स्वरानी हिने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान याबाबत कणकवली नगरपंचायत मध्ये अभियंता म्हणून कार्यरत असलेले तिचे पती सचिन नेरकर यांनी कणकवली पोलिसात खबर दिली आहे.
श्री नेरकर यांनी दिलेल्या खबरीमध्ये म्हटले आहे की, स्वरांनी हिला मुलं होत नसल्याने कुडाळ येथील डॉक्टरांजवळ तिची ट्रीटमेंट सुरू होती. दुपारी 4.30 च्या दरम्यान स्वरानी हिचा मृतदेह गड नदी पात्रात मराठा मंडळ नजीकच्या बंधार्‍याजवळ तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच भाजपा शहराध्यक्ष आण्णा कोदे, वागदे सरपंच संदीप सावंत आदिनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!