दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मोटिवेशनल अवॉर्ड दिग्दर्शक दीपक कदम यांना जाहीर
मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक आणि सिंधुदुर्ग चे सुपुत्र दीपक कदम यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी आणि प्रेरणादायी प्रवासासाठी दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मोटिवेशनल अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. याबाबत सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
लहानपणापासूनच सांस्कृतिक चळवळीत रस दाखवणाऱ्या कदम यांनी शाळा आणि महाविद्यालयीन जीवनात नाटकं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी चित्रपटसृष्टीत आपले करियर घडवण्याचे ठरवले आणि यासाठी आवश्यक शिक्षण घेतले.दीपक कदम यांनी आपल्या करियरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीतील मातब्बर दिग्दर्शकांसोबत काम केले आणि या अनुभवातून त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाच्या विविध पैलूंवर प्रभुत्व मिळवले.त्यांनी दिग्दर्शित केलेल्या
वाक्या,नगरसेवक,पुरुषा,आदी चित्रपटांनी अनेक पुरस्कार,त्यांना व्यापक प्रसिद्धी मिळवून दिली.
दीपक कदम यांच्या चित्रपटांची शैली ही अत्यंत नैसर्गिक आणि वास्तववादी असते. ते त्यांच्या चित्रपटांमध्ये कथानक, पात्रांची मनोवृत्ती आणि संवादांना विशेष महत्त्व देतात. त्यांच्या चित्रपटांमध्ये सामाजिक संदेश असतो आणि ते प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात.आता पर्यंत त्यांचे 20 चित्रपट प्रदर्शित झाले असून पुरषा या बहु चर्चित पुरस्कार प्राप्त चित्रपटाची सर्वांना उत्सुकता आहे..
दीपक कदम यांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अनेक राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मान प्राप्त केले आहेत. त्यांच्या चित्रपटांनी विविध चित्रपट महोत्सवांमध्ये देखील प्रशंसा मिळवली आहे. त्यांनी व्यावसायिक चित्रपट करताना सामाजिक विषय घेऊन पण समाजातील दलीत वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे..एका लग्नाची गोष्ट, वाक्या, सुंदरा, अट्रोसिटी, पुरषा,या चित्रपटाचे जे विषय हाताळले आहेत त्या साठी त्यांना अनेक संस्थान कडून *दलीत मित्र पुरस्कार ही प्राप्त झाले आहेत.
दीपक कदम यांच्या प्रतिभाशाली दिग्दर्शकीय प्रवासाचा यथोचित सन्मान दादासाहेब फाळके प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करून करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दीपक कदम यांचे समजतील प्रत्येक स्तरातूनअभिनंदन आणि त्यांच्या आगामी प्रकल्पांसाठी शुभेच्छा मिळत आहेत.
आचरा, अर्जुन बापर्डेकर