मालवण तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि सी एस सी सेवा केंद्र यांच्या व्ही. एल. ई सेवा संघ मालवणच्या अध्यक्ष पदी सुनील खरात
मालवण तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि सी एस सी सेवा केंद्र यांच्या व्ही. एल. ई सेवा संघ मालवणच्या अध्यक्ष पदी सुनील खरात, आचरा यांची तर सचिव पदी जितेंद्र भगत, चौके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
मालवण तालुक्यातीलसर्व महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि सी एस सी सेवा केंद्र यांच्या व्ही. एल. ई यांची सहविचार सभा नुकतीच अथर्व मंगल कार्यालय मालवण कुंभारमाठ येथे पार पडली. यावेळी व्ही एल ई यांनी आपापल्या अनेक अडचणी कथन केल्या. विशेषतः शासनाच्या प्रत्येक योजनेत सक्रिय सहभाग देऊनही शासन स्तरावरून अधिकृत केंद्र चालक यानाच टार्गेट केले जात असल्याने सर्वांनीच नाराजी व्यक्त केली. परंतु, व्ही एल ई यांनी आजपर्यंत ग्रामीण भागात काम करताना मोबदल्यापेक्षा लोकांच्या सेवेला प्राधान्य दिले आहे. यामुळे आता शासनाने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थ्यांकडून एकही रुपया शुल्क न घेता विनामूल्य राबवावी असा एकमुखी निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला असून याबाबत सर्व व्ही एल ई याना याकामी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे तालुका अध्यक्ष सुनील खरात यांनी सांगितले. तसेच महा ई सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्या प्रमाणेच ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या सी एस सी केंद्र चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले.
यावेळी निवडण्यात आलेली उर्वरित तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – कार्यध्यक्ष राजेश लब्दे, उपाध्यक्ष नवनाथ गोसावी, रणजित राणे, सहसचिव नरेन्द्र हाटले, दीक्षा दिनेश चव्हाण, खजिनदार कृष्णा साळसकर, स्वप्निल गावडे, समन्वयक राजन माणगांवकर, सल्लागार प्रदीप मिठाबावंकर, सदस्य मेघा वराडकर, दिलीप मालोन्डकर, शिवराम पालव, समीर परब, सोनाली गुराम,
याप्रमाणे तालुका कमिटी निवडण्यात आली असून लवकरच तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
यावेळी सभेचे प्रस्ताविक प्रदीप मिठबावकर यानी केले तर शेवटी जितेंद्र भगत यांनी आभार मानले.
आचरा, अर्जुन बापर्डेकर