विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढवा-बाबाजी भिसळे

नव्या वातावरणात नव्या जोमाने शिक्षण हेच आपले ध्येय घेऊन उज्वल यशातून शाळेचे आणि आपल्या गावाचे नावलौकिक वाढवा असे आवाहन आचरा हायस्कूल स्कूल समितीचे बाबाजी भिसळे यांनी आचरा हायस्कूल येथे केले. न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे स्वागत आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक स्कूल कमेटी सदस्य अर्जुन बापर्डेकर, संजय पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब,उपमुख्याध्यापक घुटूकडे,मधुरा मांणगावकर,महाभोज, यांसह इतर शिक्षक आदी उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांचे ढोलताशांच्या गजरात ओवाळणी करत मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले .यानंतर आयोजित स्वागत सोहळ्यात मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सद्गुरु साटेलकर यांनी केले.

आचरा, अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!