आचरा पोस्ट कर्मचारी सुनिल घाडी यांचे निधन
आचरा पोस्ट ऑफिस कर्मचारी आणि चिंदर गावठणवाडी येथील राहिवासी सुनिल वसंत घाडी यांचे शुक्रवारी मुंबई येथे आकस्मित निधन झाले. ते 52 वर्षाचे होते. आचरा पोस्ट ऑफिस येथे सध्या ते कार्यरत होते. आकारी ब्राम्हण देव प्रासादिक भजन मंडळ चिंदर गावठणवाडीचे भजनी बुवा म्हणून सुपरिचित होते. ते शुटींग बॉलचे ते उत्कृष्ट खेळाडू होते. त्याच्या पश्चात पत्नी, आई, बहिणी, दोन मुली, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आचरा