ग्रामसभेमध्ये वादावादी नंतर लोरे मधील काहींवर गुन्हा दाखल
ग्रामसेवक यांना कायदेशीर काम करण्यासाठी अटकाव प्रकरणी गुन्हा
लोरेतील दोन्ही गटांची कणकवली पोलिसात धाव
कणकवली तालुक्यामध्ये लोरे नंबर 1 येथे ग्रामसभेमध्ये वादावादी झाल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ करून त्यांना कायदेशीर काम करण्यासाठी अटकाव केल्याप्रकरणी लोरे नंबर 1 मधील एका गटातील काहींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर लोरे नंबर एक मध्ये दोन्ही गटांचे लोक पोलिसांना दाखल झाले होते. या प्रकरणात संशयितांवर भा. द. वि कलम 186 व जमावबंदी च्या आदेशा नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली