कणकवलीतील “त्या” सेलला आता “उत्तर सेल” ने स्थानिक व्यापारी देणार उत्तर

कणकवलीतील स्थानिक व्यापाऱ्यांकडून 31 ऑगस्ट पासून कणकवलीत महासेल सुरू

कोल्हापूरच्या व्यापाऱ्यापाठोपाठ स्थानिक व्यापाऱ्यांकडूनही जोरदार धमाका

सेल ला सेलनेच उत्तर ही “कणकवली स्टाईल” जिल्ह्यात चर्चेत

दिगंबर वालावलकर । कणकवली : कणकवलीत सध्या सुरू असलेल्या सेल मधील वस्तूंच्या किमतीपेक्षा कमी दराने स्वस्त वस्तू विकत देणारा व त्या सेल ला उत्तर देण्यासाठीची नवीन “कणकवली स्टाईल” आता समोर आली आहे. गेले काही दिवस कणकवलीतील वातावरण सेल या विषया वरून चर्चेचे बनले होते. कोल्हापूर गांधीनगर येथील व्यापाऱ्याकडून सेल लावण्यात आल्यानंतर आता त्या सेलला कणकवलीतल्या स्थानिक व्यापाऱ्यांनी त्यापेक्षाही कमी दरात वस्तू देत “उत्तर सेल” सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. व येत्या 31 ऑगस्ट पासून 10 सप्टेंबर पर्यंत हा सेल कणकवलीतील जुन्या एलआयसी बिल्डिंग मध्ये सुरू करण्यात येणार आहे. याकरिता कणकवली नगरपंचायत ने या स्थानिक व्यापाऱ्यांना सेल करीता परवानगी देखील दिली आहे. त्यामुळे ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर गांधीनगर मधील व्यापाऱ्याच्या पाठोपाठ कणकवलीत स्थानिक व्यापाऱ्यांचा जोरदार धमाका पाहता येणार आहे. या स्थानिक व्यापाऱ्यांकडून कणकवलीतील या महासेल करिता जुनी एलआयसी बिल्डिंग या ठिकाणी जागा निश्चित केली आहे. या ठिकाणी हा सेल म्हणजे कणकवली सह तालुकावासीयांना ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर हा डबल धमाका अनुभवता येणार आहे. “सेलचा माल मस्त, स्वस्ताहून स्वस्त” या टॅग लाईन खाली कणकवलीतील स्थानिक व्यापाऱ्यांनी एकत्र येत लावलेला हा बहुदा पहिलाच सेल आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय कणकवलीतील जनतेसाठी व ग्राहकांसाठी निश्चितच येत्या काळात फायदेशीर ठरणार आहे. या सेलची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून, लवकरच नवनवीन हॅन्डलूमसह कापडी वस्तू या सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या सेलची उत्कंठा आता लागून राहिली आहे.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

error: Content is protected !!