शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटणच्या आजी व माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेतील एन.सी.सी विभागाला एन.सी.सी बँड साहित्य भेट

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, तसेच प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेतील आजी व माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या एनसीसी विभागाला बँड साहित्य भेट दिले.
या विद्यार्थ्यांमध्ये अक्षय तेली, श्रेयश तावडे, अरवेंद्र कदम, भूषण जामसंडेकर, सम्मेद मिठारी यांचा समावेश आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे, सहसचिव राजेंद्र वरूणकर तसेच सर्व संचालक मंडळ, तसेच प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, एनसीसी विभाग प्रमुख शिक्षक रामदास कापसे आणि सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून आभार मानण्यात आले
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





