दामिनी पालवच्या कुटुंबीयांची माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतली सांत्वनपर भेट

अंत्ययात्रेत सहभागी होत दामिनीला वाहिली श्रद्धांजली

तालुक्यातील वर्दे येथील महाविद्यालयीन युवती दामिनी किरण पालव हिच्या निर्घृण हत्येने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी रविवारी दामिनीच्या अंत्ययात्रेत सहभागी होत तिच्या पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.
यानंतर त्यांनी पालव कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. दामिनीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे पालव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने वर्दे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
यावेळी शिवसेनेचे पप्पू पालव, संदीप सावंत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!