कोमसाप च्या कणकवली शाखा अध्यक्षपदी गणेश जेठे

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी पत्रकार गणेश जेठे यांची रविवारी एकमताने निवड करण्यात आली.कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहावर ही बैठक झाली. या बैठकीला कोकण मराठी साहित्य परिषदेचे कोकण समन्वयक प्रा. आनंद वैद्य, जिल्हा सचिव पत्रकार एडवोकेट संतोष सावंत, जिल्हा प्रतिनिधी उद्योजक संदीप वालावलकर, कणकवली शाखा सचिव निलेश ठाकूर, उपाध्यक्ष राजस रेगे खजिनदार सिद्धेश खटावकर रिमा भोसले, राजन भोसले,
निकिता ठाकूर आधी उपस्थित होते.
सुरुवातीला सचिव निलेश ठाकूर यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले.कोमसाप चे कणकवली शाखेचे यापूर्वीचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार माधव कदम यांनी आजारपणामुळे राजीनामा दिला आहे. अध्यक्ष निवडीसाठी या बैठकीत चर्चा झाली. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा कार्यकारणीतील सदस्य गणेश जेठे यांचे नाव कणकवली शाखा अध्यक्षपदी सुचविण्यात आले. उपस्थित सर्वांनी या निवडीसाठी सहमती दर्शविली.
जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी कणकवली शाखेचे कामकाज कशा पद्धतीने करावे याचे मार्गदर्शन केले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत नोव्हेंबर महिन्यात रत्नागिरी येथे जे संमेलन आयोजित केले आहे, त्याची जोरदार तयारी करावी अशी सूचना त्यांनी केली.कोमसाप च्या या साहित्य चळवळीत जास्तीत जास्त लोकांना सामावून घ्यावे, त्याबरोबरच नव्या पिढीतील साहित्यिक व कवीना या चळवळीमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना त्यांनी केल्या. प्राध्यापक आनंद वैद्य यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष निवडीनंतर गणेश जेठे यांनी सांगितले की ही जबाबदारी सर्वांनी दिली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. कणकवली तालुक्यामध्ये साहित्य चळवळ समृद्ध करण्यासाठी जी काही मेहनत करावी लागेल ती सर्वांना सोबत घेऊन करू. अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभारही त्यांनी व्यक्त केले. खजिनदार सिद्धेश खटावकर यांनी सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!