आंबोली येथे यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचे प्रात्यक्षिक

सावंतवाडी
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला आणि कृषि संशोधन केंद्र, फोंडाघाट येथे सिंधुरत्न समृध्दी योजने अंतर्गत भात, ऊस, आंबा, काजू, नारळ, सुपारी, मसाला, बांबू इत्यादी पिकांच्या गतीमान यांत्रिकीकरणासाठी कृती आराखडा (अन्न सुरक्षा दल) प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्हयात विविध ठिकाणी प्रात्यक्षिके घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे. या योजेअंतर्गत आंबोली ठिकाणी हा भात लावणी उपक्रम राबविला आहे.





