आर. टी. एस. परीक्षेत शेठ न. म. विद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्याचे उज्वल यश

दर वर्षी आर. टी. एस. इ. ही परीक्षा घेतली जाते. त्यात खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटणच्या प्राथमिक विभागाच्या व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यानी उज्वल यश संपादन केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षी घेण्यात आलेल्या आर. टी. एस. इ.परीक्षेत या विद्यार्थ्यानी आपली गुणवत्ता सिद्ध करताना आपल्या शाळेची मान ऊंचावली आहे.
यामध्ये सहावीतील विद्यार्थी रेवन अनंत राऊळ हा राज्यामध्ये तिसरा आलेला आहे. दूसरीतील विद्यार्थिनी कुमारी – सुखदा संतोष राऊत हिने 148 गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तीसरीतील विद्यार्थिनी स्वरा मिलिंद डोळ हिने 156 गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक, पाचवीतील विद्यार्थी रितेश गोरक्षनाथ गायकवाड 102 जिल्ह्यात द्वितीय, सहावीतील अनुराग सचिन महिंद्रे 130 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम, ताजीन मुश्ताक पटेल 122 गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय, सातवीतील संस्कृती संजय भोर 126 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम, आठवीतील आयुष प्रशांत आळते 78 गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय, नववीतील इकरा नजीर मुकादम 104 जिल्ह्यात द्वितीय प्राप्त केला.
या सर्व विद्यार्थ्याना जिल्हा स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्याना त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचे व त्यांच्या पालकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या उज्वल यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसूलकर, खजिनदार संदेश धुमाळे, सहसचिव राजेंद्र वरूणकर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संजय सानप, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





