भारतमाता मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवाला अभिषेक गावडे यांची सदिच्छा भेट

२२ वर्षांपासून सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम

कुडाळ शहरातील उत्कर्षनगर येथील भारतमाता मित्रमंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सव २०२६ ला शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेतले. मंडळाचे अध्यक्ष योगेश कुंभार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
भारतमाता मित्रमंडळाने गेल्या २२ वर्षांपासून धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा जपली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी विविध खेळ, पैठणीचा कार्यक्रम, पाककला स्पर्धा यांसारख्या मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करून मंडळ सामाजिक बांधिलकीही जपत आहे.
विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणणे आणि सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग वाढविणे, हे मंडळाचे वैशिष्ट्य ठरले आहे. मंडळाच्या या सातत्यपूर्ण कार्याचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख चेतन पडते यांच्यासह भारतमाता मित्रमंडळाचे कार्यकर्ते विजय तुडयेकर, प्रथमेश उपळेकर, अमर अणसूरकर, हितेश तिरवडेकर, सचिन आकेरकर, सुनील गाळवणकर, सनी गावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवरात्रोत्सवानिमित्त उत्कर्षनगर परिसरात उत्साहाचे वातावरण असून, मंडळाच्या विविध कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

error: Content is protected !!