पिंगुळीच्या बाळकृष्ण मसगे यांना ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ राष्ट्रीय युवा पुरस्कार’ प्रदान

कळसूत्री बाहुल्यांच्या पारंपरिक लोककलेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी येथील युवा लोककलाकार बाळकृष्ण गणपत मसगे यांना प्रतिष्ठेचा ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ राष्ट्रीय युवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
पिंगुळीची पारंपरिक कळसूत्री बाहुल्यांची कला जतन आणि संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या बाळकृष्ण मसगे यांच्या या सन्मानामुळे कोकणातील समृद्ध लोककलेला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पिंगुळीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






