हळबे महाविद्यालयात ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाचे उदघाटन

मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी जल, जंगल आणि जमीन (माती) यांचे सुनियोजित संवर्धन करणे आवश्यक आहे. वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता, शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर करणे उचित आहे. सध्या महाराष्ट्रात 33 टक्के भूभाग फक्त सिंचनाखाली आहे. तो अधिक सिंचनाखाली आला पाहिजे. त्यासाठी आपल्या देशातील तरुणांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. त्यांच्यावर चांगल्या संस्काराची गरज आहे. देश विकसित करण्यासाठी, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी प्रत्येकाचे सुसंस्कृत वर्तन असले पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण आणि विचार प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. त्यासाठी भारत सरकारने ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत राबविला जात आहे. तो आपण सर्वांनी यशस्वी केला पाहिजे असे मत दोडामार्ग तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर यांनी व्यक्त केले. ते येथील लक्ष्मीबाई सीताराम हजबे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलीप बर्वे, डॉ. राजेंद्र इंगळे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. सावंत यांच्या हस्ते श्री बनकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. सावंत यांनी या उपक्रमातून केल्या जाणाऱ्या वृक्षारोपण, माती परीक्षण व स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण इत्यादी नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली. झरेबांबर येथे 9 ऑगस्टला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. दिलीप बर्वे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. राजेंद्र इंगळे यांनी तर सूत्रसंचालन महिमा गवस यांनी केले. आभार डॉ. संजय खड़पकर यांनी मानले.
प्रतिनिधी l दोडामार्ग





