हळबे महाविद्यालयात क्रीडा प्रशिक्षण कार्यशाळा

मनुष्याला रोगांपासून दूर ठेवण्यासाठी शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते आणि बुद्धीचाही विकास होतो. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळाचे भरपूर महत्त्व आहे. खेळल्याने मनुष्यात धैर्य, सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होतो. असे मत सिंधुदुर्ग पोलिस विभागाचे कवायत प्रशिक्षक कृष्णा जंगले यांनी येथे व्यक्त केले. येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला
व वाणिज्य महाविद्यालयात एक दिवसीय क्रीडा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री.जंगले यांनी खेळांचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी मातोश्री राखीताई पाटकर ॲकॅडमीचे संचालक तारा पाटकर यांनी निरज चोप्रासारखे ऑलम्पिकमध्ये पदक मिळवायचे असेल तर प्रयत्न सुद्धा त्याच तोडीचे करावे लागतील.आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून आहे त्या परिस्थितीत ध्येयाच्या दिशेने वाटचाल करून परिस्थितीला लाजवता आले पाहिजे असे सांगितले.तसेच त्यांनी वैयक्तिक, मैदानी आणि सांधिक खेळाचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालय विकास समिती सदस्य विवेकानंद नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, सिंधुदुर्ग पोलिस वाहन चालक सोनिया नाईक, कनिष्का धूरी, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. संजय खडपकर, प्रा. प्रियांका गवस व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.विवेकानंद नाईक यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले. डॉ. खडपकर यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. डिपल राजपुरोहित यांनी सूत्रसंचालन केले तर वैष्णवी कदम यांनी आभार मानले.

प्रतिनिधी l दोडामार्ग

error: Content is protected !!