सुतिकागृह हॉस्पिटल सावंतवाडी चे सेवानिवृत्त वार्ड बॉय/परिचर श्रीधर माणगावकर यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार
संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई,महाराष्ट्र. चे संस्थापक राज्य खजिनदार रवींद्र पावसकर यांच्या हस्ते सन्मान.
कणकवली/मयुर ठाकूर.
सुतिकागृह हॉस्पिटल सावंतवाडी येथून ३५ वर्षे वार्ड बॉय/परिचर म्हणून काम करुन निवृत्त झालेल्या श्री श्रीधर पांडुरंग माणगावकर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार संत रोहिदास सेवा भावी संस्था मुंबई, महाराष्ट्र यांचें राज्य खजिनदार श्री रविंद्र गणपत पावसकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.सोबत जिल्हा उपाध्यक्ष श्री राजन चव्हाण सावंतवाडी.उन्नती मंडळ सिंधुदुर्ग चे उपाध्यक्ष श्री सुधाकर माणगावकर, दिपक माणगावकर, मुन्ना माणगावकर,रवि बिडवलकर,राजश्री चव्हाण व हासपिटलचे मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी माणगावकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.