मालडी येथील श्री. साबाजी दशरथ पराडकर यांना रंगभूषा प्रथम पारितोषिक

महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे आयोजित ६१ वी महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धा 2022-23 केंद्र रत्नागिरी येथील नाट्य स्पर्धेत रंगभूषा प्रथम पारितोषिक अक्षर सिंधू साहित्य कलामंच सिंधुदुर्ग च्या संकासुरा ते महाविरा या नाटकासाठी साबाजी दशरथ पराडकर यांना मिळाले आहे. साबाजी दशरथ पराडकर हे मालवण तालुक्यातील मालडी गावचे रहिवासी आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजता यशवंत नाट्य मंदिर माटुंगा मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. याबद्दल साबाजी दशरथ पराडकर यांचे मालडी ग्रामस्थ आणि मालडी ग्रामोत्कर्षकमंडळ मुंबई तसेच सर्व नाट्य प्रेमी तर्फे अभीनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!