सरंबळ गावातील युवासेनेचे काम उत्कृष्ट – मंदार शिरसाट
कै देवेंद्र संजय पडते मित्र मंडळाच्या वतीने संजय पडते यांच्या कडुन वह्या वाटप
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
सरंबळ युवासेनेचे आयोजन
प्रतिनिधी । कुडाळ : सरंबळ गावात युवा सेनेचे काम उत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांनी केले आहे. संरंबळ गावातील सरंबळ इंग्लिश स्कूल आणि प्राथमिक शाळेतिल विद्यार्थ्यांना कै देवेंद्र संजय पडते मित्र मंडळ शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या सौजन्याने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरंबळ युवासेना आयोजित सरंबळ गावातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. त्यावेळी मंदार शिरसाट बोलत होते.
यावेळी शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, शिवसेनेचे अतुल बंगे,नेरुर युवासेना विभाग प्रमुख वैभव सरंबळकर, कुडाळ शहर युवासेनेचे शहरं प्रमुख संदीप म्हाडेश्वर, कुडाळ शहर ओबीसी सेल शहरं प्रमुख राजु गवंडे सरंबळ युवासेनेचे शाखाप्रमुख संतोष राणे, युवासेना उपशाखा प्रमुख शामसुंदर करलकर, ग्रामपंचायत सदस्य घनश्याम साटम, ग्रामपंचायत सदस्या सौ शितल हळदणकर,गणपत (बाळा)जाधव,अजय राणे, संतोष कदम, युवासेना गटप्रमुख निखिल गोसावी, मनोज दांडकर,वसंत राणे,सरंबळ इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक श्री अनिल होळकर, इंग्लिश स्कूलचे सि ओ विवेकानंद बालम, तसेच पुर्ण प्राथमिक शाळा नं २, पूर्ण प्राथमिक शाळा नं १, पूर्ण प्राथमिक शाळा तळेवाडी येथे वह्या वाटप करण्यात आले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.