सोनुर्ली हायस्कूल सावंतवाडी तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने वनौषधी व सुगंधी वनस्पती लागवड

विद्यार्थ्यांना विविध वनस्पतींची ओळख व्हावी व त्यांचे आयुर्वेदिक महत्त्व समजावे ह्यासाठी उपक्रमाचे आयोजन

सावंतवाडी/प्रतिनिधी.

पृथ्वीतलावर असणारी प्रत्येक वनस्पती ही मानवास उपयुक्त आहे अन्न, वस्त्र आणि निवारा या त्याच्या मूलभूत गरजा येथील विविध प्रकारच्या वनस्पती, झाडझुडपं यांचा वापर करून पूर्ण होतात. शिवाय शारीरिक आजारांवरील उपचारांसाठीही त्याला आयुर्वेदिक औषधांच्या स्वरूपात वनस्पतींवरच अवलंबून राहावं लागतं. निसर्गात असणाऱ्या अशा वनौषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांचा म्हणजे पान, मूळ, खोड यांच्यापासून तयार केलेल्या अर्क, काढे, लेप, भस्म, गुटिका इत्यादींचा वापर वैद्यकीय उपचारांकरिता केला जातो. अनादिकालापासून ते आत्तापर्यंत औषधांच्या निर्मितीमध्ये या वनस्पतींचे महत्त्व खूप आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांना त्यांचं महत्त्व कळावं यासाठी माऊली माध्यमिक विद्यालय, सोनुर्ली व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक वनौषधीं विषयी मार्गदर्शन करून विद्यालयाच्या आवारात विविध वनौषधींची व सुगंधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. प्रशालेचे सहा.शिक्षक तथा नफडो सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री.प्रदीप सावंत यांनी विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतीं बद्दल मुलांना माहिती देऊन त्यांचे आयुर्वेदातील महत्त्व समजावून दिले
यामध्ये कडुनिंब, कोरफड, अडुळसा, पारिजातक, वेखंड, पपई, कृष्ण तुळस, लवंग तुळस, कर्पूर तुळस, मिंट तुळस, वाळा, इन्सुलिन (पेव), शतावरी, भृंगराज (मेका), पळस, आवळा, हळद, कडू किरायती, गवती चहा, केवडा, कन्हेर, पान ओवा, पुदिना, सुरपीन, एरंड, आले,पानफुटी, रुई, लिंगड, गुंज वेल, गुळ वेल इत्यादी जवळपास 30 ते 35 प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मोर्ये सर, नेफडो सिंधुदुर्गचे अध्यक्ष तथा सहा. शिक्षक श्री. प्रदीप सावंत सर, श्री. नितीन गौडळकर सर, श्री. अरुण तेरसे सर, श्री. पांडुरंग काकतकर सर, कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. अभिजित जाधव, श्री.राजेंद्र गावकर, श्री. संदीप जाधव तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

error: Content is protected !!